Share

‘कलम ३७० आमची ओळख, त्यासाठी सदैव लढा देणार’ मेहबूबा मुफ्तींची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांसोबत सविस्तर चर्चा केली. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा राजकीय आणि लोकशाही प्रक्रिया सुरू करण्यासाठी सामुहिकपणे एकत्र प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केले. तसेच, यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी लवकरात लवकर प्रयत्न करणार असल्याचे देखील पंतप्रधानांनी नमूद केले. मात्र, या बैठकीनंतर पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी कलम ३७० साठी घटनात्मक मार्गांनी लढा देणार असल्याचे मत व्यक्त केले.

‘जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा दोन वर्षांपूर्वी हिसकावण्यात आला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाने जनता नाराज आहे आणि आपली फसवणूक झाल्याचा राग त्यांच्या मनात आहे. केंद्र सरकार अवैधरित्या कलम ३७० हटवले. याविरोधात आमचे आंदोलन शांततेत सुरूच राहील. कलम ३७० ही आमची ओळख आहे. ही ओळख आम्हाला पाकिस्तानकडून नाही तर भारताकडून मिळाली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःहून आम्हाला हा दर्जा दिला होता’, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या या बैठकीला नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, काँग्रेसचे नेते गुलाम नबी आजाद, गुलाम अहमद मीर, ताराचंद, पीडीपीच्या महबूबा मुफ्ती, भाजपचे निर्मल सिंह, कविन्द्र गुप्ता आणि रवींद्र रैना, पीपल्स कॉन्फरन्सचे मुजफ्फर बेग आणि सज्जाद लोन, पँथर्स पक्षाचे भीम सिंह, सीपीआयएमचे एमवाय तारीगामी, जेके अपनी पार्टीचे अल्ताफ बुखारी सहभागी झाले होते.

एका भेटीने दुरावा कमी होणार नाही
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, ‘एका भेटीने मनातील दुरावा कमी होणार नाही. तरीही दिल्ली आणि मनातील दुरावा कमी करण्यासाठी हे चांगलं पाऊल आहे’. तर पाकिस्तानसोबत चर्चेच्या प्रश्नावर ते म्हणाले की, पाकिस्तान आपला शेजारी देश आहे. चर्चा व्हायला हवी आणि मला वाटतंय की पाकिस्तानसोबत बंद खोलीत चर्चा सुरु देखील आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!