Share

‘तो काळा दिवस विसरता येणार नाही’, आणीबाणीवरून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Published On: 

नवी दिल्ली : २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. आज या दिवसाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात देशात २१ महिने आपत्कालीन परिस्थितीची अंमलबजावणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं की, आणीबाणीचे काळे दिवस कधीच विसरता येणार नाहीत. १९७५ ते १९७७ या काळात अनेक संस्थानांचा विद्ध्वंस झाला. आपण भारताच्या लोकशाहीची भावना भक्कम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. असं आवाहनही मोदींनी केलं आहे.

 

पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर भाजपच्या इन्स्टाग्राम अकाउंटची एक लिंक शेअर करताना म्हटलं की, काँग्रेसनं आपल्या लोकशाहीला अशा प्रकारे तुडवलं. आम्ही त्या सर्व महान लोकांचे स्मरण करतो ज्यांनी आणीबाणीला विरोध केला आणि भारताच्या लोकशाहीचं संरक्षण केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!