नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन संकटाप्रकरणी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सुप्रीम कोर्टात आपला रिपोर्ट सादर केला असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. या अहवालावरून दिल्लीत भाजप आणि आम आदमी पक्ष समोरासमोर आलेत. दिल्लीत आवश्यकतेपेक्षा चार पटीने अधिक ऑक्सिजन मागवण्यात आला असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.
यावरुन भाजपने केजरीवाल सरकारवर हल्लाबोल केलाय. दुसरीकडे आम आदमी पक्षानेही पलटवार केला असून असला कोणताही रिपोर्ट अस्तित्वात नसल्याचा दावा केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत.
मनिष सिसोदिया यांनी भाजपने आपल्या पक्षाच्या मुख्यालयात हा अहवाल तयार केल्याचा आरोप केला आहे. ‘असा कोणताही अहवाल नसून तो अस्तित्वातच नाही. भाजपा खोटं बोलत आहे. भाजपचे नेता ज्या कथित रिपोर्टचा हवाला देऊन अरविंद केजरीवाल यांना शिव्या देत आहेत. आम्ही ऑक्सिजन ऑडिट समितीशी बोललो आहेत. त्यांनी आम्ही स्वाक्षरी केल्याचे किंवा मंजुरी दिले नसल्याचे सांगितले आहे,” अशी माहिती मनिष सिसोदिया यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली आहे.
Addressing an important Press Conference | LIVE https://t.co/7qh3bSOnJt
— Manish Sisodia (@msisodia) June 25, 2021
खोटा अहवाल तयार करुन भाजपा फक्त मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची बदनामी करत नसून केंद्राने ऑक्सिजनची योग्य व्यवस्था न केल्याने सदस्य गमावलेल्या कुटुंबीयांचादेखील अपमान करत आहेत. कोरोना महामारीने शिखर गाठलं असता राजधानीत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. राज्यांन ऑक्सिजन पुरवठा करताना जो गोंधळ झाला त्यासाठी केंद्रच जबाबदार आहे,” असं मनिष सिसोदिया यांनी यावेळी म्हटले.
दिल्ली में ऑक्सिजन ऑडिट कमेटी के सदस्यों ने कोई ऐसी रिपोर्ट अभी तक approve या sign ही नहीं की जैसा बीजेपी के नेता सुबह से दावा कर रहे हैं
पहले तो पूरे देश में ऑक्सिजन सप्लाई का बँटाधार किया, अब उन मरीज़ों, डाक्टर्स और hospitals को भी झूँठा बता रहे हैं जो ox की कमी से परेशान रहे— Manish Sisodia (@msisodia) June 25, 2021
काय आहे भाजपचा आरोप?
ऑक्सिजन समितीचा रिपोर्ट आल्यानंतर भाजने आप सरकारवर टीकास्त्र सोडले होते. संबित पात्रा म्हणाले होते की, ‘मला आश्चर्य वाटतं की कोरोना महामारी आपल्या पीकवर होती तेव्हा दिल्ली सरकार ऑक्सिजनच्या मुद्द्यावरुन राजकारण करत होते. हे किती खालच्या पातळीचे राजकारण आहे. रिपोर्टमध्ये ऑक्सिजन ऑडिट समितीने सादर केले आकडे धक्कादायक आहेत.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फटाके फुटायला सुरुवात झालीये, लिस्ट बरीच मोठी आहे!’
- ‘कलम ३७० आमची ओळख, त्यासाठी सदैव लढा देणार’ मेहबूबा मुफ्तींची प्रतिक्रिया
- डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारले ‘हे’ प्रश्न
- ‘तो काळा दिवस विसरता येणार नाही’, आणीबाणीवरून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
- ‘नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

