मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ जिलेटीन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला आणि या प्रकरणाला गंभीर वळण लागले. हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात आहे.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचे आज विधानसभेत पुन्हा एकदा पडसाद उमटले आहेत. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी सचिन वाझेंवर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना जबाब देखील दिला आहे. यावरूनच आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.
फडणवीस यांनी सचिन वाझेंना अटक करावी अशी मागणी सभागृहात लावून धरली. पुरावे व तक्रार असताना महाविकास आघाडी सरकार त्यांना अभय का देतंय ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येला भाजप नेताच जबाबदार असल्याचं म्हणत भाजपवर टीकास्त्र सोडलं. यामुळे सभागृहात विरोधक व सत्ताधारी आमने-सामने आल्याचं दिसून आलं.
देवेंद्र फडणवीस यांनी, ‘दोषी कोणत्याही पक्षाचा असो त्याला शिक्षा झाला पाहिजे. मात्र, हिरेन यांच्या गूढ मृत्यूशी संबंध असलेल्या सचिन वाझे यांना पाठीशी घातलं जातंय. तसंच, मी फोनचा सीडीआर मिळवला आहे, माझी खुशाल चौकशी करा,’ असं चॅलेंज देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिलं आहे. पुढे ते म्हणाले, ‘माझी चौकशी कराच मात्र दोषी हत्यारांना पाठीशी घालू नका.’
महत्वाच्या बातम्या
- रणबीर कपुर आणि संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने आलिया भट्ट क्वारंटाईन
- पेट्रोल-डिझेल ७५ रुपयांवर येणार? अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत दिलं उत्तर
- ‘बाबासाहेब आंबेडकरांची माणसाला माणसाशी जोडणारी नीती होती, तोडणारी नाही’
- मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, मात्र… बीएमसी आयुक्तांचं महत्वाचं विधान
- सैराट फेम परश्याचा कुस्ती खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल


