Share

‘बाबासाहेब आंबेडकरांची माणसाला माणसाशी जोडणारी नीती होती, तोडणारी नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नीती ही माणसाला माणसाशी जोडणारी नीती होती. माणूस तोडणारी नीती नव्हती. त्यामुळे कोणताही भेदभाव न बाळगता, समतेच्या विचाराने माणसाला माणसाशी बंधुभावाने जोडणारी चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ आहे,’ असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

घाटकोपर पश्चिम असल्फा येथील रिपाइं चे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत तुकाराम मोरे उर्फ टाटा मामा यांच्या जाहीर श्रद्धांजली सभेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी असल्फा येथे दिवंगत तुकाराम मोरे यांच्या स्मृती जोपासण्यासाठी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील रस्त्याला त्यांचे नाव देण्यात यावे त्याबाबत चा ठराव स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेत मंजूर करून घ्यावी अशी सूचना ना रामदास आठवले यांनी केली. तसेच रिपब्लिकन पक्षातर्फे दिवंगत तुकाराम मोरे यांच्या कुटुंबाला 1 लाख रुपये सांत्वनपर निधी देण्यात येणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी जाहीर केले.

दिवंगत तुकाराम मोरे हे दलित पँथर पासुन आंबेडकरी चळवळीत एका योद्ध्या सारखे संघर्ष करीत राहिले. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील होते. मुंबईत माटुंगा लेबर कॅम्प येथे आणि नंतर घाटकोपर असल्फा येथे राहून सतत रिपब्लिकन पक्षात निष्ठवंत म्हणून कार्यरत राहिले. मला साथ देत राहिले. त्यांच्या निधनाने केवळ त्यांच्या मोरे कुटुंबाला दुःख झाले नसून संपूर्ण रिपब्लिकन पक्षाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी दिवंगत तुकाराम मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दिवंगत तुकाराम मोरे यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. त्यांची रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!