मुंबई : बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी मंगळवारी सकाळी समोर आली होती. ही बातमी ताजी असतानाच बॉलीवुड मधील प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. यानंतर आभिनेत्री आलिया भट्टने खबरदारी म्हणून स्वत: ला क्वारंटाईन करुन घेतले आहे.
भन्साळी हे सध्या ते अभिनेत्री आलिया भट्टसोबत ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. पण आता भन्साळी यांना कोरोना झाल्याने या चित्रीकरणाला देखील ब्रेक लागला आहे. चित्रीकरणादरम्यान आलिया निर्माते भन्साळीच्या संपर्कात आल्याने तिने खबरदारीचा उपाय म्हणून स्वत: ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई कठियावाडी’ चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला होका. आलिया भट्टच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली भूमिका या टीझरमध्ये चाहत्यांना पाहायला मिळाली. १ मिनिट ३० सेकंदाच्या या टीझरमध्ये आलियाची अशी छाप उमटते की, प्रत्येकजण आलियाची प्रशंसा करू लागतो. मात्र निर्माते कोरोना पॉझीटिव्ह आढळल्याने ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रीकरण-प्रदर्शन पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- २०१७ साली मनसुख हिरेन यांच्याकडून सचिन वाझेंवर ४० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
- ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची का होतेय मागणी?
- संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण
- कोरोनाचा फास पुन्हा आवळतोय; सर्वात आधी नाईट क्लब बंद होण्याची शक्यता
- बायकोच्या प्रत्येक दुखापतीसाठी नवराच जबाबदार-सुप्रीम कोर्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

