मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील ‘सैराट’ या चित्रपटातील अभिनेता आकाश ठोसर याने सैराटमध्ये साकारलेलं परश्या हे पात्र लोकप्रिय ठरल. मात्र आकाश प्रचंड लोकप्रिय होऊन देखील आजही तो गावातील मित्र-मंडळींसोबत कुस्ती खेळायला जातो. असाच त्याचा एक कुस्ती खेळतानाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आकाशने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.
https://www.instagram.com/tv/CL9QjhxJ0FC/?utm_source=ig_web_copy_link
यावेळी त्याने अविस्मरणीय क्षणांचा अनुभव देखील शेअर करत तो म्हणाला की, खास माझ्या मातीतल्या पैलवान मित्रांसाठी.!! लहानपणापासूनच कळत-नकळत मातीचा लळा लागला. वडिलांनी माझ्या आणि त्यांच्या हौशेपोटी तालमीत पाठवलं आणि तालमीत ५ वर्ष काढली. तालीम जोर, बैठका, डावपेच, शिस्त या पलीकडेही बरंच काही देऊन गेली.
हा व्हिडिओ शेअर करत त्याने ‘खास माझ्या मातीतल्या पैलवान मित्रांसाठी’ असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओमध्ये परशा कुस्ती खेळताना दिसत आहे. तसेच परशा कुस्तीचे वेगवेगळे डाव टाकून समोरच्या पैलवानाला लाल मातीत उचलून आपटत आहे. शेवटी परशाला खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला जातो.
महत्वाच्या बातम्या
- बाबासाहेब आंबेडकरांची माणसाला माणसाशी जोडणारी नीती होती, तोडणारी नाही’
- कोरोनाचा फास पुन्हा आवळतोय; सर्वात आधी नाईट क्लब बंद होण्याची शक्यता
- महाविकास आघाडीचा विदर्भ, मराठवाड्यावर शैक्षणिक अन्याय; परीक्षा मंडळावर एकट्या पुण्यातुन 10 सदस्य
- बायकोच्या प्रत्येक दुखापतीसाठी नवराच जबाबदार-सुप्रीम कोर्ट
- सचिन वाझेंना अटक करा…फडणवीस संतापले; सभागृहात गदारोळ


