Share

मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, मात्र… बीएमसी आयुक्तांचं महत्वाचं विधान

Published On: 

मुंबई : मागील काही दिवसांपासून कोरोना पुन्हा फास आवळताना दिसतोय. देशासह राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाल आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकार वेळीच पावले उचलत असल्याचे दिसत आहे. तर, स्थानिक प्रशासनाकडे देखील निर्बंध लावण्यासाठी महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

काही जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्याची चर्चा आहे. राज्यात दररोज रुग्णांचा आलेख वाढत असल्याने कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. तर, राज्यात पुन्हा लॉकडाऊन होईल का ? याकडं सामान्यांचं लक्ष्य लागून आहे.

दरम्यान, राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत सध्या तरी लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचे मत मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असला तरी नियम न पाळल्यास निर्बंध अधिक कडक करावे लागतील असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

मुंबईतील स्थिती अजूनतरी हाताबाहेर गेलेली नाही. त्यामुळे लगेच लॉकडाऊन लावण्याची सध्या गरज नाही. मात्र मुंबईकरांनी गांभीर्गाने कोरोना संबंधीच्या नियमांचं पालन केलं नाही तर भविष्यात कठोर निर्णय घ्यावे लागू शकतील, असं देखील चहल यांनी नमूद केलं आहे.

मुंबईतील सध्या कोरोनाची स्थिती कशी ?

मुंबईत दर 100 चाचण्यांमागे केवळ 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 6 टक्के आहे. इतर ठिकाणचा पॉझिटीव्हिटी रेट मुंबईपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लॉकडाऊन संदर्भातला विचार होऊ शकतो, मात्र, मुंबईत ती स्थिती नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!