Share

‘हवं तर भाजपच्याच लोकांना रेमडेसिविर द्या, पण..’ हसन मुश्रीफांचे मोदींना साकडे

Published On: 

कोल्हापूर : ‘आम्ही केंद्राला साष्टांग नमस्कार करतो. लोकांना तडफडू देऊ नका, मरू देऊ नका. हवं तर भाजपच्याच लोकांना रेमडेसिविर इंजेक्शन द्या. पण लोकांना तडफडू देऊ नका, त्यांच्या कुटुंबीयांना वाचवा अशी विनंती माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे’, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. कोल्हापूरमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुश्रीफ यांनी रेमडेसिवीरचा मुद्दा उपस्थित केला.

कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिविर, बेड या गोष्टींची कमतरता जाणवू लागली आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू झालाय. भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी हिमाचल प्रदेशहून रेमडेसिविर आणले होते. याचा उल्लेख करत मुश्रीफ म्हणाले की, वास्तविक हे इंजेक्शन भाजपालाच कसे मिळाले?

राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड हे दीव दमणला जातात आणि त्या कंपनीला भेटतात. ५० हजार इंजेक्शन त्यांना मिळतात. त्याचे पैसे भाजपा द्यायला तयार होतो. केंद्र सरकार या सगळ्याचं नियंत्रण करत असेल, तर मग फक्त भाजपच्याच लोकांना इंजेक्शन द्यायचं ठरवलंय का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २९ रुग्णांचे प्राण गेल्याच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी थेट केंद्र सरकारला साकडं घातलं होतं. ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केंद्र सरकारला केली. ऑक्सिजनसाठी आम्ही पाया पडायलाही तयार असल्याचे टोपे म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!