Share

कोरोना रोखण्यास ठाकरे सरकार अपयशी, गिरीश महाजनांची टीका

Published On: 

जळगाव : महाविकास आघाडी सरकार कोरोनाला रोखण्यात सपशेल फेल ठरलेय. आपले अपयश लपवण्यासाठी ठाकरे सरकार केंद्राच्या नावाने बोंब मारत असल्याचा आरोप भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी केला. बंगाल येथील निवडणुकीची जबाबदारी आटोपून ते जळगाव जिल्ह्यात दाखल झालेत. परतल्यावर त्यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपाययोजनांचा माहिती घेतली.

गिरीश महाजन म्हणाले की, सध्या रुग्णांना बेड मिळण्यासाठी सुध्दा अडचण होत असून रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनचाही प्रचंड प्रमाणात तुटवडा भासत आहे. यामुळे कोरोनाची परिस्थतीत राज्य सरकारला हाताळता आली नाही. तर राज्य सरकारनेच उच्च न्यायालयात स्थिती हाताबाहेर गेल्याची कबुली दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांना कोणत्याही दर्जेदार सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक कोविड केअर सेंटर्समध्ये असुविधा आहेत. बऱ्याच ठिकाणी पंखेही नाहीत. राज्यातील सत्ताधारी हे मात्र सातत्याने केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम करत आहेत. खरं तर, केंद्राने महाराष्ट्राला मदत देण्यात हात आखडता घेतला नाही. राज्याला रेमडेसिविर इंजेक्शन मिळालेत, ऑक्सिजनसाठी मदत देखील मिळाली असली तरी राज्य सरकारला मात्र नियोजन करता आले नसल्याची टीका त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!