Share

‘पैसे देण्याचीही दानत असावी लागते हे ‘त्याने’ दाखवून दिले’, आव्हाडांचा निशाणा कोणावर?

Published On: 

मुंबई : देशात कोरोनाचा उद्रेक होतोय. रुग्णसंख्या वाढत असल्याने भारतात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. यावर कोणत्याही भारताच्या क्रिकेटपटूला जे जमले नाही ते आता या परदेशी क्रिकेटपटूने करून दाखवले आहे. कोरोनाच्या या लढ्यात आता ऑस्ट्रेलियाचा एक क्रिकेटपटू भारताची मदत करण्यासाठी उतरला आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सोशल मीडियावर एक पत्र जाहीर केले आहे. यामध्ये कमिन्सने सांगितले आहे की, ‘सध्याच्या घडीला भारतामध्ये फार कठिण काळ सुरु आहे. भारतामध्ये सध्याच्या घडीला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन टँक विकत घेण्यासाठी मी ५० हजार डॉलरएवढी रक्कम देत आहे.

यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पॅट कमिन्सचे आभार मानलेत. एक ट्विट पोस्ट करत आव्हाड म्हणाले की, ‘ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पैट कमिंसनं भारताला ॲाक्सिजनसाठी ५० हजार डॅार्लसची मदत केली, त्याबद्दल त्याचे मनापासून आभार. पण पैसे देण्याचीही दानत असावी लागते हे त्यानं दाखवून दिलं …thanx’ असे ट्विट त्यांनी केलेय. दरम्यान, पैसे देण्याची दानत असावी लागते हे वाक्य त्यांनी नेमके कोणासाठी वापरले यावरून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

सध्या आयपीएलच्या स्पर्धा सुरुयेत. देश-विदेशातील अनेक खेळाडू क्रिकटमध्ये व्यस्त आहेत. परंतू भारताची परिस्थिती पाहून परदेशातील खेळाडूला मदत करण्याची सुद्बुद्धी सुचली. पण भारतीय क्रिकेटपटुंनी मात्र कोरोना सारख्या गंभीर संकटाकडे डोळेझाक केल्याची टीका सोशल मीडियातून होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!