मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद केली आहे. काल महाराष्ट्राने एकाच दिवसात पाच लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले होते. त्यामुळे देशात एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरणाचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर झाला आहे. आता एकूण लसीकरणातही महाराष्ट्राने विक्रम केला आहे. आतापर्यंत राज्यात १.५ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून इतर राज्यांच्या तुलनेत ही आकडेवारी सर्वात जास्त आहे.
या कामगिरीबाबत राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘अनेक अडचणींना सामोरे जात महाराष्ट्राने जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत लसीकरणात १.५ कोटींचा टप्पा गाठला. हे यश आरोग्य यंत्रणेचे, लोकप्रतिनिधींचे, फ्रंटलाईन कोविड योद्धांचे, सामाजिक संस्थांचे, जनतेच्या संयमाचे आहे. कितीही संकटं आली तरी हा सह्याद्री झुकणार नाही.’
अनेक अडचणींना सामोरे जात महाराष्ट्राने जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत लसीकरणात १.५ कोटींचा टप्पा गाठला. हे यश आरोग्य यंत्रणेचे, लोकप्रतिनिधींचे, फ्रंटलाईन कोविड योद्धांचे, सामाजिक संस्थांचे, जनतेच्या संयमाचे आहे. कितीही संकटं आली तरी हा सह्याद्री झुकणार नाही. #MahaVaccination
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 27, 2021
दरम्यान, लसीकरणाच्या बाबतीत सुरूवातीपासूनच महाराष्ट्र आघाडीवर आहे. कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असलेले लसीकरण थांबलेले नाही. सोमवारी सकाळ पर्यंत राज्यातील १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले होते. त्यात दिवसभरात विक्रमी लसीकरणाची भर पडली. यामुळे हा आकडा सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या वर गेला होता. यात आता मंगळवारी सकाळी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच लसीकरण झालेल्या नागरिकांचा आकडा १.५ कोटी पर्यंत पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राजकीय सुडबुद्धिने अनिल देशमुखांच्या घरावर धाड, मंत्री विश्वजीत कदमांचा आरोप
- हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पोलिसांनी केला हस्तगत
- भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नव्या कोविड सेंटर्सचा प्रारंभ
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानीचा चैञी पोर्णिमा उत्सव भाविकांविना साजरा
- आपली जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलणं ही आता महाराष्ट्र सरकारची ओळख झाली आहे – दानवे


