Share

मोदीजी पाहा! बैठकीत मास्क न घातल्याने थायलंडच्या पंतप्रधानांना १४ हजारांचा दंड

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाच्या उद्रेकामुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांना नियमांचे पालन करावे असे आवाहन वारंवार राष्ट्रप्रमुख करत आहेत. पण स्वत:च नियमांचे पालन न केल्याचा फटका थायलंडच्या पंतप्रधानांना बसला आहे. थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान ओचा यांना सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ओचा यांच्याकडून १९० डॉलर म्हणजेच १४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. बँकॉकच्या राज्यपालांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, पंतप्रधान जनरल प्रयुथ ओचा हे लस खरेदी करण्याबाबतच्या बैठकीत उपस्थित होते. पण या बैठकीत त्यांनी मास्क घातला नव्हता. बँकॉकचे गर्व्हनर असाविन क्वानमुआंग यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून पंतप्रधानांविरोधात पोलीस तक्रार दाखल केल्याचे सांगितले. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटोही जोडला होता. बैठकीत इतरांनी मास्कचा वापर केला होता. तर, पंतप्रधानांनी मास्कचा वापर केला नव्हता. सोशल मीडियावर पंतप्रधानांवर जोरदार टीका सुरू झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी पावले उचलली.

दरम्यान, प्रचारसभेत मास्क न घालणे आणि ऑनलाईन बैठकीत मास्कचा वापर करण्यावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होत आहे. पंतप्रधान मोदी बंद दरवाजाआड असणाऱ्या बैठकीमध्ये मास्क घालून उपस्थित राहतात, मात्र पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारांदरम्यान मास्क घालताना दिसत नाही अशी टीका सोशल नेटवर्किंगवर सुरू आहे. मोदी प्रचारसभेत मास्क घालत नाहीत पण बंद दाराआड बैठक असताना मास्क घालतात, असे म्हणत मोदींना ट्रोल केले जातेय. मोदींनी आणि भारताच्या प्रशासनाने थायलंड देशाकडून बोध घ्यावा अशी चर्चा यानिमित्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!