धुळे : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट, पुरेसे रेमडेसिविर आणि राज्य सरकारची तिसऱ्या लाटेसाठी अपूर्ण तयारी असल्याचे दिसून येत आहे. याबाबत भाजपचे खासदार सुभाष भामरे, माजी आमदार जयकुमार रावल, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यावर प्रचंड रोष व्यक्त करीत आगपाखड केली.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर भाजपाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेऊन निवेदन सादर केली. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी म्हणून आपण शासनाचे प्रतिनिधित्व करतात. सर्व लोकप्रतिनिधींच्या भावना या राज्य शासनाकडे पोहचवू जिल्ह्यातील रुग्णांची सोय करावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने कोणत्याही गोष्टीची पूर्तता झाली नाही, ऑक्सिजन प्लांट उभारण्याबाबत मागणी करूनही कार्यवाही झाली नाही आदी विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे चर्चा करण्यात आली.
राज्य शासनाने धुळे जिल्ह्यासाठी रेमडेसिविरचा केवळ १ टक्के कोटा ठेवला असल्याने संपूर्ण जिल्ह्यात टंचाई जाणवत असल्याचा आरोप देखील करण्यात आला. यावर जिल्हाधिकारी यादव यांनी लोकप्रतिनिधींच्या भावना शासनाकडे पोहचविण्यासाठी प्रयत्न करून मार्ग काढू असे आश्वासन दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पैसे देण्याचीही दानत असावी लागते हे ‘त्याने’ दाखवून दिले’, आव्हाडांचा निशाणा कोणावर?
- ‘कितीही संकटं आली तरी हा सह्याद्री झुकणार नाही’, मंत्री जयंत पाटील यांचा निर्धार
- राजकीय सुडबुद्धिने अनिल देशमुखांच्या घरावर धाड, मंत्री विश्वजीत कदमांचा आरोप
- हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पोलिसांनी केला हस्तगत
- भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नव्या कोविड सेंटर्सचा प्रारंभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

