मुंबई : मागील वर्षी संपूर्ण जग कोरोना व महामारीचा सामना करण्यासाठी तयारीला लागले होते. भारतात सुद्धा कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली होती. याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ मार्च २०२० रोजी देशवासियांना आवाहन केले होते. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी २२ मार्च रोजी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू लागू करून त्याचे पालन करण्याचे आवाहन मोदींनी केले होते.
मोदींच्या या आवाहनाचे पालन करत त्या दिवशी संपूर्ण देशात पूर्णता शुकशुकाट पाहायला मिळाला होता. तर, सायंकाळी पाच वाजता थाळ्या, टाळ्या, शंखनाद करून कोव्हीड योद्ध्यांना बळ देण्याचं आवाहन देखील मोदींनी केलं होतं. आज या जनता कर्फ्यूला १ वर्ष पूर्ण झाले आहे.
https://twitter.com/kamitoo27/status/1373927985808556032?s=20
देशभरात हा जनता कर्फ्यू २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत होता. सर्वांना यादरम्यान घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा वगळता दुकानांपासून ते सर्व काही पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याची बंदी करण्यात आली होती.
Thalis to spoons this time last year#JanataCurfew pic.twitter.com/pZLNAZppX0
— Amil Bhatnagar (@AmilwithanL) March 22, 2021
२२ मार्च २०२० म्हणजे रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. यावेळी मोदींनी यावेळी पोलीस , डॉक्टर , सफाई कर्मचारी यांनी देशवासीयांसाठी कर्तव्य बजावले त्यांच्यासाठी सायंकाळी ५ वाजता ५ मिनिटे टाळ्या वाजवून, घंटी वाजवून, थाळ्या वाजवून आभार व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. या जनता कर्फ्यूला लोकांचा उस्त्फुर्त प्रतिसाद देखील मिळाला होता. मात्र त्यानंतर याचे विविध गमतीशीर असे चित्र संपूर्ण देशातून समोर आले होते. परंतु आजही कोरोनाचा धोका हा पूर्णतः टळला नाही. अनेक नागरिक कोरोना नियमांचे पालन करत नसल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन केला जाण्याची भीती देखील वर्तवली जात आहे. दरम्यान, या वर्षपूर्ती निमित्त त्यावेळेच्या काही घटनांच्या मिम्सचा महापूर सद्या सोशल मीडियावर आला आहे.
#JanataCurfew1stAnniversary #JanataCurfew pic.twitter.com/T0mlg2qt3a
— MULA JAGAN MOHAN REDDY (@JaganMula) March 22, 2021
https://twitter.com/sgxnifty_live/status/1373921366576046080?s=20
महत्त्वाच्या बातम्या
- सगळे नियम फक्त जनतेसाठी…? अजित पवारांच्या बैठकीत कोरोनाचे नियम तुडवले गेले पायदळी
- एटीएसच्या करेक्ट कार्यक्रमावर शरद पवार खुश, म्हणाले…
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर ताहिरा कश्यपचं बिकिनी परिधान करून चोख उत्त्तर…..
- …म्हणून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही; पवारांची ठाम भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

