Share

तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर ताहिरा कश्यपचं बिकिनी परिधान करून चोख उत्त्तर…..

Published On: 

मुंबई : एका कार्यक्रमात बोलताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिला वापरत असलेल्या फाटक्या जीन्सवर विधान केले होते. ‘आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? असे रावत म्हणाले होते. त्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. आता अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी आणि लेखिका ताहिरा कश्यप हिनेसुद्धा या वादात उडी घेतली आहे.

https://www.instagram.com/p/CMq1gzynFmX/?utm_source=ig_web_copy_link

ताहिराने सोशल मीडियावर तिचा एक जुना फोटो पोस्ट करत फाटक्या जीन्सच्या वक्तव्याला तिच्या अंदाजात उत्तर दिलंय. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्या पोस्टला दिलेलं कॅप्शन नेटकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आवडल्याचे दिसुन येत आहे .बिकिनी परिधान केलेला ताहिराचा हा जुना फोटो आहे. ताहिराने कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली असून उपचारानंतरचा तिचा हा फोटो आहे.

‘कमीत कमी मी फाटकी जीन्स तरी नाही घातली’, असा उपहासात्मक टोला तिने उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना लगावला. तिच्या या फोटोला दीड लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत .ताहिरा अनेक मुद्द्यांवर बेधडकपणे तिची मतं मांडते.फाटक्या जीन्सवरील वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याने रावत यांनी आपलं वक्तव्य मागे घेत माघार घेतली आहे. “कोणाचाही अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. महिलांचा सन्मान माझ्यासाठी नेहमीच सर्वांत महत्त्वाचा आहे”, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!