दिल्ली : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रासह देशात एकच खळबळ माजली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलावली आहे.
आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील देखील दिल्लीत आता दाखल झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी नेत्यांच्या या सर्व भेटी- गाठींवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. ‘१०० कोटीच्या हिस्सेदारांची नुसती धावपळ चालली आहे… लफडी करायची काय गरज होती?? ह्या सगळ्यांना आत टाका महाराष्ट्र स्वतःहून प्रगती करेल.’
अशा आशयाचं ट्वीट राणे यांनी केलेलं आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत. त्यामुळे आता पवार यांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या बैठकीला महत्व प्राप्त झालेले आहे. नेमका आता या बैठकीत पवार कोणता निर्णय घेणार? याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ : शरद पवार
- अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; शरद पवारांचं भाष्य !
- खळबळजनक! ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून तरुणाचा खून
- महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्र ‘दिल्ली’, दिल्लीत राष्ट्रवादीची बैठक सुरु
- “माझ्या शरीरात राजपुतांचं रक्त आहे ; मी हरामखोर नाही खरी देशभक्त आहे”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

