Share

…म्हणून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही; पवारांची ठाम भूमिका

Published On: 

दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात खळबळ माजवणाऱ्या मनसुख हिरेन खून प्रकरणातील गूढ उकलले असल्याची माहिती ATSचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी दिलेली आहे. लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिलेली आहे. यासोबतच एटीएसने याप्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचं परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील मेल केलं आहे.

या आरोपानंतर भाजपने अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. तर, काल राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी भाष्य केलं आहे.

शरद पवार म्हणाले, ‘6 ते 15 फेब्रुवारीपर्यंत देशमुख कोरोनाबाधित असल्यामुळे रुग्णालयात भरती होते. रुग्णालयातील कागदपत्रावरुन देखील देशमुख हॉस्पिटलमध्ये होते हे सिद्ध होतंय. त्यांना 15 फेब्रुवारीला डिस्चार्ज मिळाला आणि त्यानंतर 15 दिवसांचा होमक्वारंटाईन सांगितलं. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे. 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरन्टाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता. त्यामुळे या दरम्यान अनिल देशमुख होम कॉरेन्टाईन होते. त्यामुळे केलेले आरोप हे तथ्यहीन होते. म्हणूनच मग चौकशीचा मुद्दा येतो कुठून ? तसेच अनिल देशमुखांना हटवण्याचा प्रश्नच नाही,’ अशी ठाम भूमिका पवारांनी स्पष्ट केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!