Share

सगळे नियम फक्त जनतेसाठी…? अजित पवारांच्या बैठकीत कोरोनाचे नियम तुडवले गेले पायदळी

Published On: 

सोलापूर – राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 17 एप्रिलला मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीसाठी 23 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून 30 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 3 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे.

दरम्यान,या पार्श्वभूमीवर पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची बैठक रविवारी (दि. 21) आयोजित करण्यात आली होती.यावेळी श्रीयश पॅलेस येथे झालेल्या बैठकीत कोरोनाचे नियम डावलून शेकडोंनी गर्दी जमा झाली होती.आता या बैठकीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोरोना नियमांचे पालन न झाल्याने या कार्यक्रमाचे आयोजकांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या टप्प्यात पंढरपूर व मंगळवेढा या भागातील विविध शिष्टमंडळाची भेट घेताना प्रत्येक शिष्टमंडळात 20 सदस्य बंधनकारक केले होते. मात्र कार्यालयाबाहेर खूप मोठ्या संख्येने जमा झालेले राष्ट्रवादी समर्थक या कार्यालयात घुसल्यानंतर येथे हे सभा झाली. ज्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र हे होत असताना कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आल्याने निवडणुकीसाठी नेमलेल्या छायाचित्रीकरण पथक प्रमुख मिघाराज कोरे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे डीवायएसपी विक्रम कदम यांनी सांगितले.

यावेळी बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, दीपकआबा साळुंखे-पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाकार्याध्यक्ष उमेश पाटील, ‘विठ्ठल’चे चेअरमन भगीरथ भालके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या संदर्भात एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!