दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात खळबळ माजवणाऱ्या मनसुख हिरेन खून प्रकरणातील गूढ उकलले असल्याची माहिती ATSचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी दिलेली आहे. लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिलेली आहे. यासोबतच एटीएसने याप्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचं परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील मेल केलं आहे.
या आरोपानंतर भाजपने अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. तर, काल राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी भाष्य केलं आहे. ‘ATS च्या तपासाची दिशा अचूक असल्याचा मला आनंद आहे. एटीएसने दोघांना अटक केली. मुख्य केस आहे अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं आणि हिरेन हत्या ही होती. मात्र, त्यावरुन लक्ष भरकटवून विरोधकांनी परमबीर सिंह यांच्या पत्राचा मुद्दा उचलून धरला. ते चुकीचं आहे,’ असं शरद पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सगळे नियम फक्त जनतेसाठी…? अजित पवारांच्या बैठकीत कोरोनाचे नियम तुडवले गेले पायदळी
- पवारांच्या ‘त्या’ मागणीला माजी पोलीस आयुक्तांनी दिलं उत्तर; म्हणाले…
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर ताहिरा कश्यपचं बिकिनी परिधान करून चोख उत्त्तर…..
- मोठी बातमी : अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

