🕒 1 min read
नवी दिल्ली : भाजपचे माजी नेते आणि केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कोलकात्यात तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) च्या मुख्यालयात त्यांनी तृणमूलचा झेंडा खांद्यावर घेतला. आगामी काळात ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत.
यावेळी डेरेक ओ ब्रायन, सुदीप बंडोपाध्याय आणि सुब्रत मुखर्जी उपस्थित होते. सिन्हा यांच्या पक्ष प्रवेशानंतर टीएमसीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी यशवंत सिन्हा यांच्या पक्ष प्रवेशानंतर आनंद व्यक्त करताना सुब्रत मुखर्जी म्हणाले, की यशवंत सिंह आमच्यासोबत आल्याचा आम्हाला अभिमान आहे, षडयंत्र रचून ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाला नसता तर त्या स्वतः आज हजर राहिल्या असत्या असे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले असताना हा पक्ष प्रवेश तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवेल अशी शक्यता आहे. दरम्यान,ममता बॅनर्जी यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने शुक्रवारी सायंकाळी त्यांना एसएसकेएम रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. ममता रुग्णालयातून बाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
दरम्यान,पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत.भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार मुकाबला होईल, असेच सध्याचे चित्र आहे. अर्थात, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी हातमिळवणी केल्याने त्यांची आघाडीही मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- टोकियो ऑलिम्पिक मध्ये खेळाडूंच्या लसीकरणासाठी जपानने नाकारली चीनी कोरोना लस
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

