Share

टोकियो ऑलिम्पिक मध्ये खेळाडूंच्या लसीकरणासाठी जपानने नाकारली चीनी कोरोना लस

Published On: 

🕒 1 min read

टोकियो: गेल्या वर्षभरापासून कोरोना या जगभर थैमान घातलेल्या महामारीमुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम केला आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. जगातील प्रमुख क्रीडा स्पर्धा रद्द कराव्या लागल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. याला जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जाणारी ऑलिम्पिक स्पर्धादेखील अपवाद नाही

२०२० साली जपानची राजधानी टोकियो येथे पार पडणार होती. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ऑलिम्पिक स्थगित केली गेली होती. तर आता जगातील क्रीडारसिकांसाठी सर्वात मोठी पर्वणी मानल्या जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० यादरम्यान ही स्पर्धा होणार होती. त्यानंतर, २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या काळात ही स्पर्धा आयोजित करण्याचे नक्की केले गेले होते.

यावर ही स्पर्धा कोणत्याही परीस्थितीत पार पडणार असल्याच आश्वासन जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी दिले आहे. याविषयी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. जागतिक ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी म्हटले की, आम्ही खंबीरपणे स्पर्धेची तयारी सुरू ठेवली आहे. स्पर्धेविषयीची आशा आणि धैर्य जगामध्ये पसरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ठरलेल्या काळातच ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केल्या जातील.

दरम्यान, स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र या लसीकरणासाठी जपानने चीनी करोना लस वापरण्यास परवानगी नाकारली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजे आयओसीने जपानशी चर्चा न करताच चीनी करोना लस ऑलिम्पिक साठी येणाऱ्या खेळाडूंना देण्याचा प्रस्ताव जाहीर केला होता. पण जपान सरकारने हा प्रस्ताव अमान्य केला आहे.

ऑलिम्पिक मंत्री तामायो मारूकावा शुक्रवारी या संदर्भात बोलताना म्हणाले, आमचे खेळाडू चीनी लस घेणार नाहीत. या लसीला जपान मध्ये मान्यता मिळालेली नाही. जपान मध्ये फायझर आणि एस्ट्रोजेनेका लसीला परवानगी दिली गेली असून त्यांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरण करून घेणे ऑलिम्पिक मध्ये सामील होणाऱ्या खेळाडूंना बंधनकारक नाही असाही खुलासा त्यांनी केला. जपान करोना नियंत्रणासाठी सर्व उपाययोजना करत असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!