Share

महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या सोयगाव तालुक्यातील महिलांना उद्योगांसाठी व आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी स्तरावरून सर्वोतोपरी प्रयत्न करून महिलांना आर्थिक बळकटीकरण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सोयगावात तब्बल ६६ गटांना एकाच वेळी ९० लक्ष रुपये इतके कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचं चारही शाखांमधून तब्बल ३८९ पैकी १६७ कर्ज प्रस्ताव मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवाले यांनी व्हिडियो कॉन्फरन्स वरून आढावा बैठकीत दिली.

सोयगावला बचत भुवन सभागृहात महाराष्ट्र राज्य जीवनज्योती अभियानाच्या आढावा बैठकीचे जिल्ह्यात पहिल्यांदा सोयगावला करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रकल्प संचालिका संगीतादेवी पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे श्रीकांत कारेगावकर, समाज कल्यान सभापती मोनाली राठोड, पंचायत समितीचे सभापती साहेबराव गायकवाड, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, जीखा अभियान व्यवस्थापक सुचिता खोतकर, प्रज्ञा दाभाडे, राजेंद्र देशपांडे, महाराष्ट्र बकेचे अहिलजी थोरात, सोयगाव बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक राहुल भिलाने आदींची उपस्थिती होती.

गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रकल्प संचालिका संगीतादेवी पाटील, अग्रणी बँकेचे श्रीकांत कारेगावकर, अहिलाजी थोरात आदींचं हस्ते ६६ महिला बचत गटांना ९० लक्ष रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना प्रकल्प संचालिका संगीतादेवी पाटील यांनी सोयगाव तालुक्त्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबातील महिला सदस्य महिला बचत गटात सामाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या असून ३० एप्रिल पर्यंतही संकल्पना साध्य करण्यात यावी. असे आवाहन महिला बचत गटांना केले असून महिलांच्या उद्योगासाठी भरारी मारण्यासाठी महिलांना आर्थीक सक्षमीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.

महिला बचत गटांच्या महिलांच्या सदस्यांनी आपल्या कुटुंबासह व्यवसाय करतांना स्वतःची काळजी घ्या, मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.गोंदावले यांनी व्हिडियो कॉन्फरन्सवरून महिलांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास साळुंखे यांनी केले. यावेळी तालुका कक्ष अधिकारी प्रदीप देवरे, राठोड आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमासाठी महिला बचत गटाच्या अध्यक्ष सदस्य आणि महिला बँक सखी, सी.आर.पी आदींची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!