औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा ही २१ मार्च रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आठ दिवसांचा अवधी मिळाला आहे. माझ्याकडून एमपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा असल्याचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांनी शुक्रवारी सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील एमपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा कोरानाच्या काळामध्ये तसेच लॉकडाऊन असल्याने पुढे ढकलल्याचा निर्णय गुरुवारी घेतला. तर महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यामध्ये सर्व जिल्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करुन सरकारविरोधी घोषणा देत सरकारचा धिक्कार अश्या घोषणा देखील विद्यार्थ्यांनी या आंदोलनाच्या वेळी दिल्या. या पार्श्वभमूीवर राज्यातील सत्ताधारी पक्षातील आमदारांनी पुढाकार घेवून सरकारचा निर्णय कसा बरोबर आहे. तर आपण त्याला समर्थन देत असल्याचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुक्रवारी समर्थन दिले.
या वेळी औरंगाबादचे पश्चिम मतदारासंघाचे आमदार यांनी सोशल माध्यमावर ही परिक्षा लांबवल्याचे समर्थन करुन विद्यार्थ्यांना पुन्हा आठ दिवस अभ्यासासाठी मिळाले असल्याचे म्हणाले. आणि परिक्षेच्या तयारीसाठी तसेच परिक्षेबाबत शुभेच्छादेखील दिल्या असल्याचे समाजमाध्यमांवर बघायला मिळाले. खरे तरी सरकारच्या निर्णयाचे स्वागत होण्यापेक्षा समाजमाध्यमांवर खुप नाराजी, विरोधीपक्षांकडून देखील या बाबतचा खरपुस समाचार देखील घेण्यात आला आहे. परंतू सत्ताधारी आमदार या नात्याने ठाकरे सरकारला समर्थन करणारे ही पोस्ट केली असल्याचे समजते.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे – नितेश राणे
- विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना अनिल बोंडे म्हणाले ‘तुम्ही तर सरकारचे कुत्रे’
- शिवसेनेच्या माजी खासदाराविरोधात शिवराळ भाषेत पोस्ट; अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- #MPSC : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

