🕒 1 min read
औरंगाबाद: शहरामधून निर्माण होणाऱ्या नागरी घनकचऱ्यावर प्रक्रियेसाठी पडेगाव, कांचनवाडी, चिकलठाणा येथे उभारण्यात आलेल्या नागरी घन कचरा प्रक्रिया प्रकल्पांची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी पाहणी केली. घनकचरा प्रक्रिया करताना निर्माण होणाऱ्या लिचेट कलेक्शन टँकमधील प्रदूषित पाण्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करुनच योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश त्यांनी संबंधीत विभागास जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी औरंगाबादचे तहसीलदार ज्योती पवार, अप्पर तहसीलदार किशोर देशमूख, महाराष्ट्र प्रदुषण नियामक बोर्डचे प्रादेशिक अधिकारी प्रविण जोशी, उपप्रादेशिक अधिकारी प्रदिप वानखेडे, क्षेत्र अधिकारी रविराज पाटील, डॉ. गजानन खडकीकर, महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापण केंद्र प्रमुख नंदकिशोर भोंबे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शहराला स्मार्ट, सुरक्षित करण्याबरोबरच शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यासाठी पडेगाव, कांचनवाडी, चिकलठाणा घनकचरा प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने चालविण्यात यावे. त्याच बरोबर येथे निर्माण होणाऱ्या लिचेट कलेक्शनवर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुनच योग्य विल्हेवाट लावावी. तसेच येथे काम करणाऱ्या कामगारांसाठी हातमोजे, मास्क व इतर सुरक्षित साधणांची उपलब्धता असावी. तसेच प्रकल्प परिसरात मोठया प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन केले जावे,अशा सुचनाही चव्हाण यांनी संबंधितांना दिल्या.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिल्लोड नगरपरिषद सरसावली
- रोहित शर्माचा पहिल्या टी-२० संघात समावेश नसल्याने संताप; मुंबई इंडियन्सने केलं ‘हे’ ट्विट
- धक्कादायक! लातूरच्या वसतिगृहात तब्बल ८७ विद्यार्थी कोरोनाबाधित
- कारवाईचा अतिरेक नको; राज्याच्या मुख्य सचिवांनी दिल्या महत्वाच्या सूचना
- ‘रायवाडीत छत्रपती शिवरायांचा पुतळा पूर्ववत बसवावा, अन्यथा आत्मदहन’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
