🕒 1 min read
अमरावती: महिला व बालकल्याण मंत्री व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजप व कॉंग्रेसमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेत्यांनी मोदींवर चांगलाच निशाणा साधला आहे. यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नेहरू व राजीव गांधी यांच्याशी केली आहे. शेतकऱ्यांनी अडवल्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कांगाव्याची घटना घडली आणि मग ५६ इंचाच्या गप्पा मारणार यांची कोल्हेकुई समोर आली, अशा शब्दात ठाकूर यांनी मोदींवर टीका केली आहे.
नेमकी याच काळात शेतकऱ्यांनी अडवल्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कांगाव्याची घटना घडली. आणि मग 56 इंचाच्या गप्पा मारणार यांची कोल्हेकुई समोर आली. भारतासारख्या समृद्ध आणि विशाल लोकशाही परंपरा असलेल्या देशात pic.twitter.com/tt02qKPlfL
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 8, 2022
पुढे त्या म्हणतात, जनतेमध्ये जाणारे लोकनेते आणि लोकांमध्ये राहून काम करणारे पंतप्रधान या देशाने नेहमीच पाहिले आहेत. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा स्वातंत्र्य मिळाले त्यावेळचा एक किस्सा सांगितला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संसदेच्या आवारात एका वृद्ध स्त्रीने पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या शर्टाची कॉलर पकडून देशाला स्वातंत्र्य मिळाले, मला काय मिळाले? असा सवाल केला. यावेळी हसत पंडित नेहरू म्हणाले पंतप्रधानांची कॉलर पकडण्याचे स्वातंत्र्य.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याबद्दल देखील त्यांनी एक किस्सा सांगितला, २००९ मध्ये पंतप्रधान असताना अहमदाबाद मध्ये मनमोहन सिंग यांच्या दिशेने एका तरुणाने बूट फेकून मारला. पण त्यावेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर कुठलेही खापर न फोडता त्या तरुणाला सोडून द्या, असा मनाचा मोठेपणा दाखवणारे मनमोहनसिंग पाहायला मिळाले.
स्वतःच्या जिवाला धोका असल्याचा कांगावा करणारे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीही लोकांनी पाहिले. भारतातील जनता सुज्ञ आहे, त्यांना सत्य आणि आभास यांची जाण आहे. जनते प्रती असलेली निष्ठा आणि वाफेवरचा बुडबुडा यांची पारख जनता नक्कीच करेल.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 8, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत यशोमती ठाकूर म्हणाल्या, लोकांपासून पळ काढणारे, आणि मतदार माय-बाप जनतेपासूनच स्वतःच्या जिवाला धोका असल्याचा कांगावा करणारे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीही लोकांनी पाहिले. भारतातील जनता सुज्ञ आहे, त्यांना सत्य आणि आभास यांची जाण आहे. जनते प्रती असलेली निष्ठा आणि वाफेवरचा बुडबुडा यांची पारख जनता नक्कीच करेल, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
- वडिलांच्या निधनानंतर विशाल ददलानी भावूक, म्हणाला “त्यांना शेवटचे…”
- “मला वाटतं बीसीसीआयने…”; विराट कोहली पत्रकार परिषदेला न येण्याबाबत प्रशिक्षकांची प्रतिक्रिया
- मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रीम कोर्टात विनोद पाटील मांडणार ‘हा’ महत्वाचा मुद्दा
- ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा आता ‘या’ तारखेपासून होणार
- धोनीने पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला दिले गिफ्ट, ट्वीट व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
