Share

वडिलांच्या निधनानंतर विशाल ददलानी भावूक, म्हणाला  “त्यांना शेवटचे…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीत दिग्दर्शक आणि गायक विशाल दादलानींच्या (Vishal Dadlani) वडिलांचे निधन (death) झाले आहे. त्यांनी ८ जानेवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. विशालने सोशल मीडियावर वडिलांसोबतचा फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे. विशालच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान विशालने इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘श्री मोती दादलानी (Moti Dadlani) (१२ मे १९४३-८ जानेवारी २०२२) मी माझ्या जवळचा मित्र, या जमीनवरील सर्वात चांगला आणि दयाळू माणसाला रात्री गमावले आहे. मला त्यांच्या पेक्षा चांगले वडील मिळाले नसते. मी आज एक चांगला माणूस आहे ते ही फक्त त्यांच्यामुळेच. ते गेल्या ३-४ दिवसांपासून आयसीयूमध्ये होते. मात्र ”मी त्यांना शेवटचे भेटूही शकलो नाही. कारण मी कोरोना पॉझिटिव्ह होतो. या कठीण काळात माझ्या आईसोबत सुद्धा नाही थांबू शकत. हे ठीक नाही” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

https://www.instagram.com/p/CYdF38ilP17/?utm_source=ig_web_copy_link

”गेल्या तीन-चार दिवसांपासून ते आयसीयूमध्ये (ICU) होते, पण मला कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे मी कालपासून जाऊ शकलो नाही.” तसेच त्याची बहिण सध्या सर्व काही करत असल्याचे सांगितले. ‘नशीब माझी बहिण माझ्यापेक्षा खूप स्ट्राँग आहे. ती सर्व गोष्टी सांभाळत आहे. मला कळत नाहीये की त्यांच्या शिवाय या जगात कसा राहू. मी खूप तुटलो आहे’ असे विशाल पुढे म्हणाला आहे. काही दिवसांपूर्वी विशाल दादलानीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. त्याने स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले. त्यानंतर आता त्याने वडिलांचा फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!