धोनीने पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला दिले गिफ्ट, ट्वीट व्हायरल

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफला महेंद्रसिंह धोनीकडून एक खास भेट मिळाली. जी खुप सन्माननीय असल्याचे त्याने म्हटले आहे. सध्या बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सचे प्रतिनिधित्व करत असलेल्या रौफने धोनीकडून मिळालेल्या भेटीची माहिती त्याच्या ट्विटर अकाउंटवर दिली.
 
रौफने ट्विटरवर एमएस धोनी आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ व्यवस्थापक रसेल यांचे आभार मानले. रौफने ट्विट केले की, “लिजेंड आणि कॅप्टन कूल एमएस धोनीने मला त्याच्या जर्सीच्या रुपात एक सुंदर भेट देऊन सन्मानित केले. क्रमांक-७ अजूनही त्याच्या अद्भुत आणि दयाळू हावभावाने मन जिंकत आहे.”

रौफला एमएस धोनीविरुद्ध खेळण्याची कधीही संधी मिळाली नाही. तो २०२१ च्या टी २० विश्वचषकात पाकिस्तान संघाचा भाग होता. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाचा संघाच्या विजयात मोठा वाटा होता. त्याने चार षटकांत केवळ २५ धावा देत एक विकेट घेतली होती. 

 रौफने आपल्या स्पेलमध्ये हार्दिक पांड्याला बाद केले होते. तेव्हा एमएस धोनी भारतीय संघाच्या मेंटॉरची भूमिका बजावत होता. एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या –