मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रीम कोर्टात विनोद पाटील मांडणार ‘हा’ महत्वाचा मुद्दा

मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात (Marathi Reservation) १२ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी (hearing in Supreme Court) होणार असून या सुनावणीत मराठा समाजाच्यावतीने विनोद पाटील (Vinod Patil) हे महत्त्वाचा मुद्दा मांडणार आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर विनोद पाटील यांच्यावतीने पुनर्विचार याचिका (Review Petition) दाखल करण्यात आली होती. या याचिकेसंदर्भात १२ जानेवारी रोजी न्यायमूर्तींच्या दालनात सुनावणी होणार आहे.

राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले होते. अनेकवेळा मराठा बांधव रस्त्यावर उतरून आले होते. मोर्चे देखील काढण्यात आले. मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवरून आता १२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी न्यायालयात विनोद पाटील यांच्या वतीने वकील संदीप देशमुख हे बाजू मांडणार आहेत.

१२ जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत विनोद पाटील अनेक महत्वाचे मुद्दे मांडणार आहेत. सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना तीन मुद्दे सांगितले होते. यात आरक्षण देण्याचा अधिकार राज्याकडे नाही, असं कोर्टाने सांगितलं आहे. मात्र, लोकसभा अधिवेशनात आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला देण्यात आले आहेत. हा मुद्दा तसेच समाजाची परिस्थिती हे न्यायालयात मांडले जाईल, अशी माहिती विनोद पाटील यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या: