३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा आता ‘या’ तारखेपासून होणार

मुंबई: राज्यात वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुन्हा झपाट्याने पासरणाऱ्य या कोरोनाने अनेक नेत्यांना देखील घेरले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी घेतला आहे. येत्या ३१ जानेवारीपासून वैद्यकीय परीक्षा घेण्यात येणार होत्या. मात्र राज्यात कोरोना तसेच ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षा आता फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या. तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा ह्या दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या: