Share

“यश विराट सारखाच दबावात चांगला खेळतो”; यशाच्या कोचची भविष्यवाणी ठरली खरी

Published On: 

मुंबई : भारताच्या अंडर १९ संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत वर्ल्ड कप फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे. भारताने ९६ धावांनी ऑस्ट्रेलियाला नमवले. भारताचे विजय निश्चित करताना कर्णधार यशाने ११० धावांची धमाकेदार खेळी केली होती. अंडर १९ वर्ल्डकपमध्ये शतक करणारा तो तिसरा भारतीय कर्णधार बनला आहे. यशाच्या कोचने स्पर्धेआधीच यशाच्या प्रतिभेबाबत सांगितले होते.

भारतीय संघ अंडर-१९ वर्ल्डकपसाठी रवाना होण्यापूर्वी कोच प्रदीप कोचर म्हणाले होते, “यश स्वतःवर दबाव येऊ देत नाही. तो हुशार, शांत आहे आणि भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे हे देखील त्याला कळते. आजकाल युवा खेळाडूंना अपेक्षांचे ओझे सांभाळणे कठीण जाते. पण यश याला अपवाद आहे. तो स्वतःवरच्या दबावाला वाढू देत नाही आणि नेहमी इतरांपेक्षा दुप्पट मेहनत करण्यास तयार असतो.” यशने कोच प्रदीप यांनी केलेल्या भविष्यवाणीला सेमीफायनल मध्ये केलेल्या खेळीने खरे ठरवले आहे.

स्पर्धेच्या सुरुवातीलाच कर्णधार यश धूलला कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्याने कोरोनामुक्त झाल्यानंतर पुनरागमन करत संघाला फायनलपर्यंत आणले आहे. यशच्या आधी विराट कोहली (२००८) आणि उन्मुक्त चंद (२०१२) यांनी शतक केले होते. सोबतच विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांनी त्यानंतर भारतीय संघाला वर्ल्डकपही जिंकून दिले होते. त्यामुळे या दोघांसारखेच शतक केल्यानंतर यश भारताला ५वा अंडर १९ वर्ल्ड कप जिंकून देईल अशी आशा भारतीय क्रिकेट रसिकांना आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!