पुणे: टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला शिक्षण परिषदेकडून 2020 मध्ये ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात आले होते. मात्र, शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे याने सुशील खोडवेकरच्या सांगण्यावरून जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढले आणि कंपनीला पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचे कंत्राट दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यातच टीईटी गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेला भारतीय प्रशासकीय अधिकारी सुशील खोडवेकरचा अंतरिम जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला.
मध्यंतरी अटक झाल्यावर सुशील खोडवेकर याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जास सायबर पोलिसांच्या वतीने सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी विरोध केला. टीईटी प्रकरणातील आरोपी प्रभावशाली पदावर काम करत असून, त्याच्या चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीचा कालावधी अजून संपलेला नाही. राज्य सरकार त्याच्या आरोग्याची काळजी घेत असून , त्यामुळे आरोपीला जामिनावर मुक्त करण्यात येऊ नये असा युक्तिवाद देखील सरकारी वकील जाधव यांनी केला.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि आरोपीचे म्हणणे ऐकून घेतल्यावर सुशीलखोडवेकर यांचा अंतरिम जामीन अर्ज आज फेटाळला. दरम्यान, टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातीळ प्रमुख आरोपी सुशील खोडवेकरला पुणे सायबर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली होती. शिवाजीनगर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याला अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. सुशील खोडवेकर 2009 च्या बॅचचा आयएएस अधिकारी असून त्याने शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून काम केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र करून…’; परमबीरसिंग यांचा गंभीर आरोप
- हा तर राजकारण्यांच्या खुशामतीचा प्रकार; माजी महापौर विजया रहाटकरांचा पांडेय यांच्यावर आरोप!
- “गृहमंत्र्यांच्या घरात मणिपूरच्या नेत्यांना बुट काढायला लावले…”; राहुल गांधींचा आरोप
- निकटवर्तीयांच्या ईडी चौकशीनंतर संजय राऊतांचे पुष्पा स्टाईल ट्वीट; म्हणाले, “२०२४ तक…पर हम झुकेंगे नहीं”
- मुंबई महानगरपालिकेचा या वर्षीचा शैक्षणिक अर्थसंकल्प जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

