Share

अभिनयातील देव हरपला… 

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मराठी आणि हिन्दी चित्रपटसृष्टीत पाच तपाहून अधिक काळ आपली सेवा देणारे ज्येष्ठ रंगकर्मी रमेश देव यांचे काल वयाच्या ९३ व्या वर्षी विलेपार्ले, मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सीमा देव, मुलगे अभिनेता अजिंक्य देव, आणि अभिनय देव, सुना – नातवंडे आणि असंख्य मित्र परिवार आहे. गुरुवारी दुपारी विलेपार्ले येथील स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार होणार आहेत.

रमेश देव यांचा जन्म अमरावतीचा, पण त्यांचे घराने राजस्थानमधील जोधपूरचे होते. त्यांचे कुटुंब नंतर कोल्हापुरात स्थायिक झाले. कोल्हापुरात त्यांचे पूर्वज छत्रपती शाहू महाराजांच्या पदरी अभियंता आणि न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. देव यांनी करवीर नगरीला  (कोल्हापूर) आपली कर्मभूमी मानले होते. तेथील भक्ती सेवा विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले.

सन १९५१ मध्ये पहिला चित्रपट त्यांनी केला होता. तेथून सुरू झालेला प्रवास २०१६ सालापर्यंत चालला. हिन्दी, मराठी, सिनेमा, नाटक अश्या सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप ठेवली. हिन्दी मध्ये त्यांना भरपूर मागणी असताना देखील त्यांनी मराठी सोडली नाही. मराठीत नायक, खलनायक या दुहेरी भूमिका करत असताना देखील ते नाटकांत कामे करायचे हा त्यांचा मोठेपणा होता. काम करताना संवाद पाठ, वेळेचे बंधन, शिस्तप्रियता हे त्यांचे विशेष गुण होते. सहकलाकार वयाने कितीही लहान असला तरी त्याला प्रेमाने ‘अरे मित्रा’ अशीच हाक मारायचे. सर्वांची काळजी घेत, सर्वांना शिकवत, सांभाळत कामे करणे हा त्यांचा ठायी भाव असायचा. आयुष्याच्या उत्तरार्धात देखील त्यांनी अभिनय सोडाला नाही. त्यांच्या चित्रपटातील गाजलेली गाणी सर्वांच्या तोंडावर नेहमीच घोळत राहतील. सर्वच भूमिकांना त्यांना न्याय दिला आणि मागच्या लोकांना अभिनय पुस्तक ते ठेऊन गेले.

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणारे देव कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत फेरफटका मारायला जायचे, तेव्हा त्यांची ओळख राजा परांजपे आणि भालजी पेंढारकरांशी झाली. १९५१ साली आलेल्या ‘पाटलाची पोर’ या चित्रपटात त्यांनी लहान भूमिका साकारली. राजा परांजपे यांनी त्यांना अभिनय क्षेत्रात येण्याची संधी दिली. राजा परांजपे यांना ते गुरु मानत. पुढे राजा परांजपे यांनी १९५६ साली प्रदर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या चित्रपटातून त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. याच काळात भळजी पेंढारकर यांनी ‘ये रे माझ्या मागल्या’ या चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका दिली. पुढे मात्र त्यांनी मागे वळून न पहाता एकापेक्षा एक मराठी चित्रपट गाजवले. देवघर, उमज पडेल तर, पैशाचा पाऊस, जगाच्या पाठीवर, सुहासिनी, वरदक्षिणा, अपराध  इत्यादी त्यांचे त्या काळाचे  गाजलेले चित्रपट. हिन्दीत त्यांचा ‘आरती’(१९६२) पहिला चित्रपट. पुढे त्यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन,  शत्रुघ्न सिन्हा या मोठ्या कलाकारांसोबत आपल्या अभिनयाची चुरस दिली.

खलनायक

उंचापुरा, गोरा, राजबिंडा, देखणा खलनायक कोणी पहिल्यांदा पहिला असेल तर तो रमेश देवच. खलनायक देखणा असू नये काय? असा प्रश्न त्यांनी सर्वांना पाडला. सुरुवातीच्या काळात त्यांनी बऱ्याच खलनायकी भूमिका साकारल्या. सुषमा शिरोमणि यांच्या भिंगरी चित्रपटात तर त्यांना मराठीतील दुसरे मोठे खलनायक निळू फुले यांची साथ लाभली. इरसाल बाप-लेक असे हे दोन मोठे नटसम्राट एकाच चित्रपटात पहाताना प्रेक्षक मनोरंजनात पुरते न्हाऊन निघाले.

नलिनी सराफ ते रमेश सीमा देव जोडी

जगाच्या पाठीवर या चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली. पुढे एकमेकाच्या प्रेमात पडत ते विवाहबद्ध झाले. नंतर रमेश सीमा देव जोडी चित्रपटात असेल तर चित्रपट तूफान हीट होतात हे समीकरणच पडले. या जोडीला रसिकांनी मोठी पसंती दिली.

अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष

२००८ साली झालेल्या ८८ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

अभिनेता ते नेता

१९९६ साली शिवसेनेच्या तिकीटावरून त्यांनी कोल्हापुरातून लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती. कॉँग्रेससचे खासदार उदयसिंहराव गायकवाड यांच्या विरोधात त्यांना दोन लाख मते मिळाली होती. एकदा प्रचार यात्रा सुरू असताना त्यांना समोरून एक लग्नाची वरात येताना दिसली, त्यांनी खाली उतरून त्या वरातीत नाच करत लोकांशी संवाद साधला. त्यांच्या स्वभावात मी पणा कोठेच नव्हता.

अहो कसली नव्वदी ही तर पंचविशी 

रमेश देव हे वयाने जरी वृद्ध झाले असले तरी मनाने मात्र पंचविशीतील तरुण होते. ‘सुर तेच छेडीता’ या आपल्या आवडत्या गाण्यावर त्यांनी एका कार्यक्रमात नाच करत आपल्या मनाची तरुणाई दाखवली.

जीवन गौरव

२०१३ साली पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (PIFF) मध्ये त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!