Share

“व्वारे व्वा नवाब साहेब, हर्बल गांजा वाले आपली नशा…”, सदाभाऊंचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: वाईनविक्री निर्णयावरून भाजप सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये असल्याचा टोला लगावला होता. या टीकेवर आता माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (former Minister of State Sadabhau Khot) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये असल्याचे नवाब मलिक म्हणतात. व्वारे.. व्वा.. नवाब साहेब, हर्बल गांजा वाले आपली नशा सत्तेची असल्याने असं बिन बुचाचं सुचत आहे. प्रश्न कोण दारू पीत आहे हा नाही तर, दारू कुठे विक्री साठी उपलब्ध करून दिली जात आहे याचा आहे”, असे ट्वीट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.

दरम्यान नवाब मलिक यांनी भाजप वाईन निर्णयाला विरोध करत आहे, मात्र अगोदर शिवराज सरकारने, गोवा, हिमाचल प्रदेश सरकारने असाच निर्णय घेतला होता की नाही हे भाजपने सांगावे. भाजप त्यांच्या नेत्यांचे दारू बनवण्याचे परवाने परत करणार का हा आमचा प्रश्न आहे. तसेच अनेक नेते मद्यही बनवत आहेत. अनेकांची तर मद्य विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे सर्वाधिक दारू पिणारे लोकं भाजपात असून भाजपने दारू पिणार नाही अशी शपथ घ्यावी, असे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!