Share

‘सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र करून…’; परमबीरसिंग यांचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (former Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी मोठा खुलासा केला आहे. वाझेला खात्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोप त्यांनी ईडीच्या जबाबात केला आहे. तसेच आता आणखी काही खळबळजनक आरोप परमबीरसिंग यांनी केले आहेत.

परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी ईडीला दिलेला जबाब आरोपपत्रात नमूद करण्यात आलाय. परमबीरसिंग म्हणाले, चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात वाझे आणि अनिल देशमुख यांची भेट झाली होती. त्यावेळी वाझे यांनी ईडीला दिलेला जबाब परत घ्यावा म्हणून देशमुख यांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता. शिवाय या भेटीदरम्यान दोघांमध्ये चर्चा झाली होती, असा आरोपही परमबीर सिंह यांनी केला आहे.

पुढे बोलताना परमबीरसिंग म्हणाले, सचिन वाझे (Sachin Waze) यांना तुरुंगात विवस्त्र करून त्यांना शिवीगाळ केली जाते आणि त्यांच्यावर दबाव टाकला जातोय, असा गंभीर आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. तसेच ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सचिन वाझे मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत असताना त्यांच्यासोबत चर्चा केली होती. यावेळी पाटील यांनी सचिन वाझे यांच्यावर दबाव आणला होता, असंही परमबीरसिंग यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!