🕒 1 min read
मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे. या भाववाढीमुळे सामान्य जनता त्रासली आहे. मात्र या प्रकरणावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहे. पंतप्रधान मोदीच्या या गप्प बसण्यावर भारताच्या एका माजी क्रिकेटपटुने टिका केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत राजकारणाच्या खेळपट्टीवर नवा डाव सुरु केलेल्या मनोज तिवारीने इंधन दरवाढीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साथला आहे. यावेळी मनोज तिवारीने नरेंद्र मोदी यांचे २०१२ साली केलेले ट्विट शेअर केले आहे. या ट्विटमध्ये मोदीनी पेट्रोलचे वाढलेले भाव हे कॉंग्रेस सरकारचे अपयश आहे हे सिद्ध करते असे सांगितले होते.
Massive hike in #petrol prices is a prime example of the failure of the @BJP4India led Central Govt.
Amid an ongoing pandemic, this has already put an unimaginable burden on the general public. Yet, Hon'ble PM Shri @narendramodi remains silent!#ModiBabuPetrolBekabu https://t.co/qTf0tszEfc
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) July 4, 2021
या ट्विटला शेअर करत मनोज तिवारीने, ‘इंधनाचे गगनाला भीडलेले भाव हे भाजप सरकारच्या अपयशाचे उत्तम उदाहरण आहे. कोरोना महामारीमुळे आधीच त्रासलेली सामान्य जनता इंधन दरवाढीमुळे अधिकच भरडली गेली आहे. पण आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रमोदी मात्र गप्पच राहतील.’ अशी त्याच्यांच शब्दात टिका केली आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या मनोज तिवारी हे ममता बॅनर्जी सरकारमध्ये क्रीडा मंत्री आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बाजीराव ते कपील देव’ अष्टपैलु रणवीरचे ३६व्या वर्षात पदार्पण!
- …अन् रैनानं स्वीकारलं कोहलीचं चॅलेंज ; पाहा मजेदार व्हिडीओ
- नारायण राणे होणार केंद्रीय मंत्री ?, दिल्लीहून आले तातडीचे बोलावणे
- निवड समिती अध्यक्षांच्या हट्टामुळे पृथ्वी शॉ इंग्लंड दौऱ्याला मुकला
- आयपीएल २०२१ मध्ये श्रेयस अय्यर करणार पुनरागमन ; दिल्लीच्या कर्णधारपदावर दिलं उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

