🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाचा आघाडीचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरची दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजसाठीही निवड झालेली नाही. मात्र श्रेयस हा दुखापतीतुन सावरत आहे आणि तो लवकरच मैदानात पुनरागमन करताना दिसेल. श्रेयस अय्यरने द ग्रेट क्रिकेटर्स नावाच्या युट्यूब चॅनलवर आपल्या फिटनेस विषयी माहिती दिली. ‘माझ्या खांद्याच्या उपचारांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता अंतिम टप्प्यात स्ट्रेन्थ आणि रेंज मिळवण्याचं काम सुरू आहे. यासाठी जवळपास एक महिन्यांचा वेळ लागेल. आयपीएलमध्ये मी खेळू शकेन, असं वाटत आहे,’ असं अय्यर म्हणाला.
श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे ऋषभ पंतला दिल्लीचं नेतृत्व देण्यात आलं होतं. कोरोनामुळे स्थगित झालेली आयपीएल आता युएईमध्ये होणार आहे, तेव्हा दिल्लीचं नेतृत्व कोण करणार? असा सवाल अय्यरला विचारण्यात आला, तेव्हा त्याने टीमचे मालक यावर निर्णय घेतील, असं उत्तर दिलं आहे. ‘टीम आधीपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. आणि आमचं लक्ष्य फक्त ट्रॉफी जिंकणं आहे, कारण अजूनपर्यंत आम्हाला ती कधीच मिळाली नाही,’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
श्रेयस अय्यरला इंग्लंड विरुद्दच्या मालिकेत खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की अय्यरला शस्त्रक्रीया करावी लागली. शस्त्रक्रीयेमुळे अय्यरला आयपीएल स्पर्धेतुन माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे तो आयपीएल 2021 मध्ये खेळू शकला नाही, तसंच श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजसाठीही त्याची निवड झाली नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘सुशांत प्रकरणात दाखवलेली तळमळ राजू साप्तेच्या वेळी कुठे गेली’ ; केदार शिंदेंनी व्यक्त केली खंत
- पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! प्रणव मुखर्जींचे पुत्र ‘तृणमूल’मध्ये
- मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी म्हणाले, ‘ही तर हिंदुत्त्वाचीच देण’
- ‘हिंदू-मुस्लिम वेगवेगळे नाहीत, सर्वांचा डीएनए एकच’, मोहन भागवत यांचे वक्तव्य
- ‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर वादविवाद नकाे’, संभाजीराजेंचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
