मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गील दुखापतग्रस्त झाल्यामुळे आगामी कसोटी मालिकेतुन बाहेर पडला आहे. त्याच्या जागी भारतीय संघात पृथ्वी शॉची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर चांगलाच वाद सुरु आहे.
हा वाद शिगेला पोहोचला असताना निवड समिती आणि भारतीय संघात दरम्यान सुरु असलेला वाद चव्हाट्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांची मागणी केली होती. मात्र निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा त्यांना विरोध होता अशी माहिती समोर आली आहे. शुभमन गीलची दुखापत समोर आल्यानंतर संघ व्यवस्थापनाने इंग्लंड दौऱ्यासाठी दोन खेळाडुंची मागणी केली आहे.
मात्र निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. यामुळे संघ व्यवस्थापन निवड समातीचे संयोजक जय शाह यांच्याकडे विनंती करण्याची शक्यता आहे. तसेच या दौऱ्यावर राखीव खेळाडू म्हणून निवड झालेला अभिमन्यु ईश्वरनच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थीत केले जात आहे. पृथ्वी शॉ आणि अभिमन्यु दोघांच्या कामगीरीत खुप तफावत असल्यामुळे पृथ्वीला डावलुन त्याची निवड कोणत्या निकषावर झाली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएल २०२१ मध्ये श्रेयस अय्यर करणार पुनरागमन ; दिल्लीच्या कर्णधारपदावर दिलं उत्तर
- फुल और कांटे! इंग्लंड की श्रीलंका, पृथ्वी शॉवर केलेलं जाफरचं ट्विट तुफान व्हायरल
- आयपीएलमध्ये पुन्हा १० संघ! स्पर्धेचे स्वरुपही बदलण्याची शक्यता
- ‘सुशांत प्रकरणात दाखवलेली तळमळ राजू साप्तेच्या वेळी कुठे गेली’ ; केदार शिंदेंनी व्यक्त केली खंत
- जेम्स अॅंडरसनने गाठला मैलाचा टप्पा! प्रथम श्रेणीत १००० बळी पुर्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
