Share

‘बाजीराव ते कपील देव’ अष्टपैलु रणवीरचे ३६व्या वर्षात पदार्पण!

Published On: 

मुंबई : बॉलीवुडमध्ये  नेहमीच उत्साहात असणारा अभिनेता रणवीर सिंह त्याच्या कामामध्ये देखील असा उत्साह कायम ठेवत असतो. अल्पावधीतच रणवीर सिंहने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. रणवीर सिंहचे लाखो चाहते आहेत. बॉलीवुडमध्ये या सुपरहिट अभिनेत्याचा आज वाढदिवस…

रणवीरचच्या ३६ व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून रणवीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अवघ्या १० वर्षांत रणवीरने बॉलिवूडमध्ये स्वत:चं अस वेगळ स्थान निर्माण केलं. ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारली आहे.

https://www.instagram.com/p/CQ8AFeeh0T8/?utm_medium=copy_link

बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात करण्यापूर्वी त्याने एका प्रसिद्ध जाहिरात कंपनीत कॉपी-रायटरची नोकरीसुद्धा केली होती. रणवीर हा अभिनेत्री सोनम कपूरचा चुलत भाऊ आहे. अभिनय आणि अफलातून डान्सरसोबतच रणवीर उत्तम रॅपरही आहे.

https://www.instagram.com/p/CQu5IaEhlGT/?utm_medium=copy_link

रणवीरने २०१८मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत इटलीमध्ये लग्नगाठ बांधली. रणवीरची स्टाइल स्टेटमेंट चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. तो फॅशनच्या बाबतीत नेहमीच नवीन काही तरी करत असतो त्यावरून त्याची अनेकदा चर्चा होत असते. रणवीर लवकरच ’83’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तो भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!