नवी दिल्ली : येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मधल्या काळात दोन केंद्रीय मंत्र्यांचं निधन झालं होतं. शिवाय शिवसेना आणि अकाली दल एनडीएतून बाहेर पडली आहेत. तसेच अनेक मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खाती आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरण्यावर केंद्र सरकारने भर दिल्याचं बोललं जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारत भाजपचे नेते आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
नारायण राणे यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या कार्यालयातून राणेंना फोन करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना स्थान मिळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे.
भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. दिल्लीत राणेंची जे पी नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
शिवसेना, शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहेत. तर लोजपा नेते रामविलास पासवान यांचं निधन झाल्याने मंत्रिमंडळातील त्यांचं पद रिक्त आहे. त्याशिवाय अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएल २०२१ मध्ये श्रेयस अय्यर करणार पुनरागमन ; दिल्लीच्या कर्णधारपदावर दिलं उत्तर
- फुल और कांटे! इंग्लंड की श्रीलंका, पृथ्वी शॉवर केलेलं जाफरचं ट्विट तुफान व्हायरल
- आयपीएलमध्ये पुन्हा १० संघ! स्पर्धेचे स्वरुपही बदलण्याची शक्यता
- ‘सुशांत प्रकरणात दाखवलेली तळमळ राजू साप्तेच्या वेळी कुठे गेली’ ; केदार शिंदेंनी व्यक्त केली खंत
- जेम्स अॅंडरसनने गाठला मैलाचा टप्पा! प्रथम श्रेणीत १००० बळी पुर्ण


