🕒 1 min read
इंग्लंड : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.
इंग्लंड संघासोबतच्या कसोटी मालिकेसाठी बराच वेळ शिल्लक असल्यामुळे भारतीय संघ आता तीन आठवड्यांच्या सुट्टीवर असेल 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्याअगोदर तीन आठवड्यांचा आराम घेऊन खेळाडू 14 जुलै रोजी सरावासाठी परत एकत्र येतील.
https://www.instagram.com/reel/CQ0KmqvJ9PT/?utm_source=ig_web_copy_link
यादरम्यान, कर्णधार विराट कोहलीने आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने एक चॅलेंज दिलं आहे. विराटने ‘बॅट बॅलन्स’चं चॅलेंज दिलं आहे. त्याचं हे चॅलेंज पत्नी अनुष्काने देखील स्वीकारलं होतं आत हे चॅलेंज मिस्टर आयपीएल किंग अशी ओळख असलेला सुरेश रैनाने विराट स्वीकारलं आणि ते पूर्णही केलं… सुरेश रैनाने आपल्या उजव्या हाताच्या बोटांवर बॅटचा बॅलन्स उत्तमरित्या सांभाळला आणि विराट अनुष्काचं बॅट बॅलन्स चॅलेंज पूर्ण केलं… विराट आणि अनुष्काचं हे चॅलेंज एकदम टकाटक आहे, असं चॅलेंज पूर्ण केल्यानंतर व्हिडिओ पोस्ट करताना सुरेश रैना यांनी म्हटलं.
https://www.instagram.com/reel/CQ8LeHDlPZy/?utm_source=ig_web_copy_link
महत्त्वाच्या बातम्या
- जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाईनंतर अजित पवारांचे प्रथमच भाष्य, म्हणाले..
- ‘सर्व काही नियमांनुसारच!’, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे उत्तर
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- इन्स्टावर व्हायरल होणार भूत आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पहा व्हिडिओ
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
