मुंबई : टी-२० क्रिकेट म्हणजे केवळ चौकार आणि षटकाराची आतिषबाजी अशी सुरुवातीच्या काळात प्रथा लागु झाली. कालांतराने यात गोलंदाजाची भूमिका महत्वाची ठरत गेली. टी-२० सामन्यातील आखेरची तीन षटके निर्णायक ठरतात. ही षटके टी-२० साठी स्पेशलिस्ट गोलंदाजाला दिली जातात. मात्र भारतीय संघातील दीपक चाहर एक असा गोलंदाज असा आहे जो सुरुवातीच्या षटकात चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपक चाहरने असा दावा केला आहे की त्याने त्याच्या कारकिर्दीत केवळ एकाच सामन्यात वाईट गोलंदाजी केली आहे. तो सामना ऑस्ट्रेलिया विरुद्धचा होता असेही चाहर यावेळी म्हणाला. त्या सामन्यात दीपक चाहरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४८ धावा दिल्या होत्या. मात्र या प्रदर्शनावर बोलताना प्रांजळ कबुली देताना दीपक म्हणाला की, ‘एका सामन्यात माझ्याकडून वाईट कामगिरी झाली आणि हे कोणत्याही खेळाडू सोबत होऊ शकते. मात्र मला आनंद होतोय की संघाच्या अपेक्षा मी पुर्ण करण्यात यशस्वी ठरत आहे.’ असे म्हणाला.
दीपक चाहरने भारतीय संघाकडून १३ टी-२० सामने खेळले आहेत. यात दीपकने दोन वेळेस सामनावीराचा पुरस्कार तर एकदा मालीकावीराचा पुरस्कार पटकावला होता. इतक्या छोट्या कारकिर्दीत टी-२० प्रकारात गोलंदाज असताना हे पुरस्कार पटकावणे अभीमानाची बाब आहे असे प्रतिपादन दीपक चाहरने यावेळी केले. दीपक चाहरने १३ टी-२० सामन्यात ७.५६ च्या इकॉनॉमी रेटने १८ बळी घेतले आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या आगामी श्रीलंका दौऱ्यात दीपक चाहरला संघात स्थान मिळु शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- शाहरुख खानच्या लहान मुलाने ‘या’ चित्रपटातून केले बॉलीवूडमध्ये पदार्पण !!
- अभिनेता संजय दत्तला मिळाला युएईचा गोल्डन व्हिसा; सोशल मिडियाद्वारे दिली माहिती
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
- ‘तुम्ही तज्ज्ञ नाहीत, रुग्णांच्या जिवाशी खेळू नका’, व्हेंटिलेटर प्रकरणावरून खंडपीठाने नेत्यांना सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

