Share

शाहरुख खानच्या लहान मुलाने ‘या’ चित्रपटातून केले बॉलीवूडमध्ये पदार्पण !!

Published On: 

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहाना अनेकदा त्यांचा लहान भाऊ अबरामसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. या फोटोंना नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळताना दिसते. शाहरुखच्या मुलांचे देखील मोठा चाहता वर्ग आहे. विशेष म्हणजे आज शाहरुखच्या लाडक्या लहान लेकाचा म्हणजेच अबराम खानचा आठवा वाढदिवस आहे. २०१३ सालात सरोगसीच्या मदतीने अबरामचा जन्म झाला. मात्र शाहरुखच्या लहानग्या अबरामने एका सिनेमातून आधीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केल आहे.

शाहरुखचा मुलगा अबरामने २०१४ सालामध्ये आलेल्या ‘हॅपी न्यू इयर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली आहे. ‘साडे मेनू क्यू शराबी कहते है’ या गाण्याच्या शेवटी शाहरूख अबरामसोबत नाचताना दिसतोय. या गाण्यात अबराम खूपच गोड दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सिनेमाच्या शेवटी क्रेडीटमध्ये अबराम आणि शाहरुखची पत्नी गौरी देखील दिसून आली आहे.

एका मुलाखतीत शाहरुखने यावर खुलासा करत म्हणाला की, ‘हा खूप घाईत घेतला गेलेला निर्णय होता.’ यापूर्वी शाहरुखचा मोठा मुलगा आर्यनही एका सिनेमात झळकला होता. तेव्हा तो केवळ अडीच वर्षांचा होता. तर सुहानाने देखील एका शॉर्टफिल्ममध्ये काम केलं होतं. या फिल्ममध्ये तिनं केलेला अभिनय पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!