Share

अभिनेता संजय दत्तला मिळाला युएईचा गोल्डन व्हिसा; सोशल मिडियाद्वारे दिली माहिती

Published On: 

🕒 1 min read

दुबई : अभिनेता संजय दत्तचे कुटुंब बहुतेक वेळा दुबईमध्ये राहते. संजय दत्तला फुफ्फुसांचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. योग्य उपचार घेतल्यानतंर संजय दत्तने कर्करोगावर मात केली आणि पुन्हा एकदा त्याच्या कामाला सुरुवात केली होती. नुकतेच संजय दत्तला युएईचा गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. संजय दत्तने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर संजय दत्तनेही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. एक पोस्ट शेअर करत ट्विटरवर त्याने युएई सरकारचे आभार देखील मानले आहेत. संजय दत्तने काही फोटोही शेअर करत लिहिले आहे की, ‘@GDRFADUBAI चे डायरेक्टर मेजर जनरल मोहम्मद अहमद अल मर्री यांच्या उपस्थितीत युएईचा गोल्डन व्हिसा मिळणं हा माझा मोठा सन्मान आहे.’  संजय दत्त हा व्हिसा मिळवणारा पहिला बॉलिवूडचा अभिनेता आहे.

फ्लाई दुबईचे सीओओ हमद ओबैदल्ला यांचं देखील आभार मानले आहेत. विशेष म्हणजे गोल्डन व्हिसा मिळवणारे परदेशी नागरिकांना युएईच्या नागरिकांप्रमाणे अधिकार दिले जातात. युएईचा गोल्डन व्हिसा हा १० वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी दिला जातो. युएईचा गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर सोशल मिडियावर अनेक लोकांनी संजय दत्तचे अभिनंदन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!