Share

डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस

Published On: 

नवी दिल्ली : उत्तराखंड ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’नं योगगुरू बाबा रामदेव यांना तब्बल १ हजार कोटींची मानहानीची नोटीस धाडलीय. रामदेव यांनी ‘अॅलोपॅथी’ संदर्भात केलेल्या वक्तव्यांवरून आयएमए नाराज आहे. येत्या १५ दिवसांत योगगुरु रामदेव यांनी लेखी माफी मागवी तसंच व्हायरल झालेल्या वक्तव्यांबद्दल प्रतिवाद करणारा व्हिडिओ पोस्ट करावा, अशी मागणी आयएमएकडून करण्यात आलीय. रामदेव यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर १००० कोटींचा दावा दाखल केला जाईल, असे सांगण्यात आलेय.

उत्तराखंडच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखेने बाबा रामदेव यांना नोटीस पाठवली आहे. आयएमने म्हटले आहे की, “बाबा रामदेव यांनी आपली औषधं विकली जावी यासाठी सातत्याने खोटं बोलत आहेत. बाबा रामदेव यांनी आपल्या औषधांची चाचणी केली आहे, परंतु कुठल्या रुग्णालयात या औषधांची चाचणी करण्यात आली हे त्यांनी सांगितलेच नाही. कारण त्यांनी या औषधाची कुठल्याच प्रकारची चाचणी केलेलीच नाही. डॉक्टरांविरोधात अशा प्रकारे वक्तव्य केल्यामुळे लोकांच्या मनात बाबा रामदेव यांच्याबद्दल राग आहे असेही आयएमने म्हटले आहे.

आपले औषध विकले जावे म्हणून बाबा रामदेव लसीकरणामुळे साईड इफेक्ट्स होत असल्याची जाहिरात करत आहे असे आयएमने म्हटले आहे. तसेच सरकारने बाबा रामदेव यांच्या विरोधात साथरोग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला नाही तर त्यांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करू असेही आयएमएने म्हटले आहे.

एका डॉक्टरला ५० लाख

आयएमए उत्तराखंडचे प्रदेश सचिव डॉ. अजय खन्ना यांच्याकडून बाबा रामदेव यांना सहा पानांची नोटीस धाडण्यात आलीय. रामदेव यांच्या वक्तव्यामुळे आयएमए उत्तराखंडशी निगडीत दोन हजार सदस्यांची मानहानी झाल्याचं, त्यांनी या नोटिशीत म्हटलंय. एका डॉक्टर सदस्याच्या मानहानिसाठी ५० लाख यानुसार एकूण एक हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा उल्लेख त्यांनी आपल्या नोटिशीत केलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!