औरंगाबाद : भंडारा येथील बाल रुग्णालयाच्या कक्षाला आग लागून दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शहरात अशाप्रकारची घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या शहरातील कोविड रुग्णालयांतील फायर सेफ्टी यंत्रणेची तपासणी सुरू केली आहे. दुसर्या दिवशी मंगळवारी (दि.२७ )शहरातील पाच रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. तपासणीत तीन रुग्णालयात सुसज्ज फायर सेफ्टी यंत्रणा व हाताळणारे कर्मचारी कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. तर दोन रुग्णालयातील उपकरणामध्ये त्रुटी असल्याने तेथे वाढ करावी लागणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख आर. के. सुरे यांनी दिली.
या पथकाने मंगळवारी कमलनयन बजाज हॉस्पिटल कोविड सेंटर, सीएसएम हॉस्पिटल कोविड सेंटर, लाईफ हॉस्पिटल कोविड सेंटर, गोल्डनसिटी हॉस्पिटल कोविड सेंटर, अल्पाईन हॉस्पिटल या पाच रुग्णालयांची तपासणी केली. संबंधित रुग्णालयात आगीचा प्रकार घडल्यास प्राथमिक उपाययोजना करता येतील, अशी व्यवस्था असल्याचे सुरे यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमले आहे. हे पथक रुग्णालयांतील ऑक्सिजन गळती व आगीचे प्रकार रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे का, याची तपासणी करत आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील ५६ रुग्णालयांची तपासणी केली जाणार आहे. सोमवारपासून या तपासणीस अग्निशमन विभागाचे प्रमुख आर. के. सुरे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात करण्यात आली.
मंगळवारी शहरातील पाच रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. यातील तीन रुग्णालयात सुसज्ज फायर सेफ्टी यंत्रणा कार्यान्वित असून कर्मचार्यांना यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण दिलेले आहे. दोन रुग्णालयात उपकरणे बसविण्यात आली असून त्यामध्ये आणखी वाढ करण्याची गरज आहे. तसेच तेथील कर्मचार्यांना उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. संबंधित रुग्णालयांना प्रशिक्षणासाठी अग्निशमन विभागाला पत्र पाठवण्याची सूचना पथकाने केली. पत्र प्राप्त होताच संबंधित रुग्णालयांतील कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले जाईल, असे माहिती आर.के. सुरे यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- याचिका दाखल झाल्यावर खा.सुजय विखे म्हणाले, ‘रेमडेसिवीरचा बाऊ करू नका’
- औरंगाबादेत लसीकरणावर ‘महासंकट’! वारंवार मागणी करुनही शासनाकडून लस देण्यात कुचराई का?
- कसे बसे दोन दिवस बसले तिसऱ्या दिवशी माजलगावात पुन्हा केली गर्दी
- मेल्ट्रॉन रुग्णालयात रेमडेसिविर चोरीला, आयुक्तांचे चौकशीचे आदेश!
- जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा प्रमुख स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

