अहमदनगर : रेमडेसिवीरच हेच कोरोनावर उपचार नाहीये. त्याचा बाऊ करू नका. रुग्ण सामान्य उपचारानेही बरे होत आहेत. तसेच लसीकरण करणे महत्वाचे आहे. पण ते गर्दी करून न करता सर्व नियम पाळून करून घ्यावेत, असे आवाहन भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. कर्जत येथे ते बोलत होते.
जे गंभीर रुग्ण आहेत, त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार ठरवलेले उपचार करू द्यावे. नातेवाईकांनी त्यांना रेमडेसीविरचा सल्ला न देता त्यांना उपचारासाठी स्वातंत्र्य द्यावे. भविष्यात आणखी रेमडीसीवरचा तुटवडा वाढण्याची दाट शक्यता आहे, असे सूचक वक्तव्य विखे यांनी व्यक्त केले. व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण होत आहे. पुढील ३ ते ४ दिवस जनता कर्फ्यु पाळला गेला, तर निश्चित कोरोना साखळी ब्रेक होईल. यासाठी नागरिकांनी स्वत: पुढे येत पाळावे, असे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमतः लसीकरण करावे, असे आवाहन केले होते. पण त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे लस आणि त्याचा साठा वाया जाऊ नये. त्यामुळे ती लस भारत सरकारने बाहेर दिली होती. आता कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली आणि नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजले. आता लसीकरण साठा अल्प असल्याने यामध्ये काही अंशी खंड पडत असून अल्प प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. मात्र, ही परिस्थिती लवकरच सुधारेल आणि सर्वाना लस मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी डॉ. विखे यांनी शिर्डी विमानतळावर दिल्लीहून ही इंजेक्शन्स आणली होती. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डी संस्थान, प्रवरा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयास ती मोफत देण्यात आली. दरम्यान, रेमडेसिवीरचा साठा आला कोठून ? व त्यांना कसा मिळाला ? यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विखेंना लक्ष्य केलं आहे. दरम्यान, डॉ. सुजय विखे यांच्यावर योग्य कारवाई केली जावी अशी मागणी करणारी याचिका नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजप खा.भामरेंकडून ऑक्सिजन प्रकल्पासाठी एक कोटींची मदत
- ढगाळ वातावरण, तरीही पारा ४२ अंशावर
- कौतुकास्पद! नाशिकच्या एकलहरे गावात ‘घर तिथे ऑक्सिजन बेड’चा निर्णय
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटना, केंद्राकडून मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत
- लसींचे दर उत्पादकांवर सोपवल्यास काळाबाजार वाढेल, सचिन पायलट यांचा इशारा


