औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी करमाड भागातून गजानन पठाडे यांच्या शेतातून अज्ञात लोकांनी त्यांची जनावरे चोरल्याची तक्रार त्यांनी दिली होती. हि चोरी करणारा टोळी प्रमुख पसार होता. त्याला मंगळवारी बेड्या ठोकण्यात आल्या. शेख मुख्तार उर्फ कालू शेख चांद रा. नायगाव असे टोळी प्रमुखाचे नाव आहे.
वरझडी येथील पठाडे यांची तीन जनावरे दि. २४ रोजी अज्ञात लोकांनी चोरून नेल्याची तक्रार त्यांनी करमाड पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देत या प्रकरणाचा छडा लावण्यास सांगितले. त्यानुसार खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, पठाडे यांची जनावरे चोरणारा चिकलठाणा गावाच्या पुढे काही जनावर चोरी करण्यासाठी येणार आहे.
त्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. माहितीतील इसम चिकलठाणा गावाच्या बाहेर ट्रक घेऊन आला. आधीच सापळा लावलेल्या पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. त्याला पठाडे यांच्या जनावरांची विचारपूर केल्यावर त्याने कबुली देत. आणखीन गुन्हे काबुल केले.
यात त्याचे तीन साथीदार देखील सामील असल्याचे सांगितले. सय्यद हरून सय्यद शहानुर रा. नायगाव, साहिल जहांगीर कुरेशी रा. जटवाडा रोड, बाबा सुलेमान कुरेशी रा. जटवाडा रोड अशी त्यांची नावे आहे. त्यांनी करमाड मध्ये २, खुलताबाद मध्ये ३, चिकलठाण्यात १, पाचोड मध्ये १, बिडकीन मध्ये १, अशा ९ गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३ लाख २ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूला आयसीसीने केले निलंबीत
- ‘स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या रांगा मोदी सरकारला आयुष्यभर छळतील’
- ढगाळ वातावरण, तरीही पारा ४२ अंशावर
- ‘एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे एक निष्ठावान व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले!’
- ‘या घटना आणि फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील’


