Share

कसे बसे दोन दिवस बसले तिसऱ्या दिवशी माजलगावात पुन्हा केली गर्दी

Published On: 

बीड: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शहरात तसेच जिल्ह्यात शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र हे दोन दिवस होताच सोमवारी पुन्हा गर्दी दिसून आली. माजलगाव येथील मोंढ्यात वाहनांनी रस्ते जाम झाले होते. तसेच लसीकरण केंद्रांवर देखील लोकांची गर्दी दिसून आली. या झालेल्या गर्दीत फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाला तिलांजली मिळत असल्याचे दिसले.

मागील दोन दिवसांपासून माजलगाव शहर हे काही अपवाद वगळता कडकडीत बंद होते. शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ला खरच नागरिक प्रतिसाद देत आहेत, असे वाटू लागले होते. पण दोनच दिवस कसा बसा नागरिक तग धरून बसले होते, तिसऱ्या दिवशी पुन्हा जैसे थे. येथील मोंढा भागात सोमवारी दिसून आलेली गर्दी पाहता खरच कोरोना आहे काय ? असा प्रश्न मनात निर्माण होत होता.

सोमवारी झालेल्या या गर्दीत कुठेही सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन होताना दिसत नव्हते तर मोंढ्याच्या असलेल्या सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने एकच गर्दी उसळली. दरम्यान येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या ठिकाणी तर सामाजिक अंतराचे नियम पायदळी तुडवल्याने तोबा गर्दी पाहावयास मिळाली. आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याऐवजी वादच जास्त उपस्थित करताना नागरिक येथे दिसून येत होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!