औरंगाबाद : संपूर्ण देशात रेमडेसिविरवरुन राजकीय वातावरण तापले आहे. रेमडेसिविरची पळवापळवी, काळाबाजार, चोरी प्रकरण यांसारख्या गोष्टी सर्रासपणे घडत आहेत. औरंगाबादेतही मोठ्या प्रमाणावर रेमडेसिविर प्रकरणे घडत आहेत. महापालिकेच्या मेडीकल स्टोअर रुममधून ४८ रेमडेसिवीर इंजक्शन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२८) रोजी उजेडात आला आहे. या प्रकरणी आयुक्तांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश देत पाच जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
देशात रेमडेसिविरवरुन दररोज नवनव्या गोष्टी कानावर येत आहेत. असाच धक्कादायक प्रकार औरंगाबाादेत देखील घडला आहे. महापालिकेने कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी सरकारच्या कोट्यातून दहा हजार रेमडेसिवीर खरेदी केले होते. यातील काही रेमडेसिवीर घाटी व जिल्हा रुग्णालयास देण्यात आले. तर चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रूग्णालय अर्थातच मिनी घाटीला देखील यातून काही इंजेक्शन दिले होते. आता मनपाच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये देखील इंजेक्शन चोरीला गेल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
मनपाने साडेचार हजार इंजेक्शन मेल्ट्रॉन कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी वापरले. उर्वरीत रेमडेसिवीर इंजक्शन मनपाच्या स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आले. त्याची नोंदही घेतली. परंतु स्टोअर रूममधून ४८ रेमडेसिवीर इंजक्शानचा बाॅक्स गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी स्टोअरमधील पाच जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून २४ तासात खुलासा मिळाला नाहीतर गुन्हा दाखल करणार असल्याचे आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- जमत नसेल तर सांगा आम्ही सर्व केंद्र सरकारकडे सोपवतो, हायकोर्टाने केजरीवालांना झापलं
- जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा प्रमुख स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- कागदी घोडे नाचवणे बंद करा; बैठकीत आ. मेटेंचा बीड प्राशासानाला खोचक सल्ला !
- उस्मानाबादेत तब्बल १५ दिवसांनंतर घटली कोराेना मृत्यूची संख्या
- महाराष्ट्राच्या शेजारी असणाऱ्या आणखी एका राज्यात लॉकडाउनची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

